Marathi - 5 इफेक्टिव्ह मार्केटिंग व बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीस

Marathi - 5 इफेक्टिव्ह मार्केटिंग व बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीस

Marathi - 5 इफेक्टिव्ह मार्केटिंग व बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीस

  • Rajesh Gurule

  • 3 minute read

नुकतीच आपल्या ग्रुपमधील B2C म्हणजे डायरेक्ट कस्टमर्सना त्यांचे प्रोडक्ट देणारे उद्योजक यांच्यासोबत 1 to 1 मिटींग झाली. त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणात मी त्यांच्यासोबत काही 'इफेक्टिव्ह मार्केटिंग व बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीस' शेयर केल्या.

आपल्या सर्व उद्योजक बांधवांनाही ह्या स्ट्रॅटेजीसीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणून त्या स्ट्रॅटेजीस मी इथे शेयर करीत आहे.

'नो नॉनसेन्स' बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी 1 = 'टारगेटेड कस्टमर्स ओन्ली' स्ट्रॅटेजी

टार्गेट मार्केट व टार्गेट कस्टमर्स निवडा. तुमच्या प्रॉडक्ट /सर्व्हिसेसची गरज सर्वानाच असू शकते. पण म्हणून सर्वचजण तुमचे कस्टमर्स नाहीत.

शिवाय सर्वांनाच टार्गेट करायला आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नसतात. तेवढे मार्केटिंग बजेट नसते. म्हणूनच टार्गेट कस्टमर्स निवड व त्यांच्यावरच फोकस करा. तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे तुमचे कस्टमर्स बनवू शकाल.

'नो नॉनसेन्स' बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी 2 - ‘लो हँगिंग फ्रुट्स' स्ट्रॅटेजी

‘लो हँगिंग फ्रुट्स' कस्टमर्स ओळखा व त्यांना आधी अप्रोच करा.

प्रत्येक प्रॉडक्ट व सर्व्हिससाठी काही कस्टमर्स असे असतात जे इतरांपेक्षा आधी, इतरांपेक्षा लवकर तुमच्याकडून खरेदी करू शकतात. त्यामुळे आधी त्यांना अप्रोच करा. ह्या कस्टमर्सना तुम्ही लवकर व सोप्या रीतीने तुमचे प्रोडक्टस किंवा सर्व्हिसेस सेल करू शकाल.

'नो नॉनसेन्स' बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी 3 - ‘रिहॅश सेलिंग' स्ट्रॅटेजी

एका कस्टमरना एका वेळेस एकच प्रॉडक्ट न विकता त्यांना तेच प्रॉडक्ट जास्त क्वांटिटी मध्ये सेल करा - जर ते प्रॉडक्ट त्यांना पुन्हा पुन्हा लागत असेल तर !

खूप वेळा आपण जर कस्टमर्सना ऑप्शन्स दिले. तर ते तुमच्याकडून जास्त क्वांटिटीमध्ये पर्चेस करू शकतात. एका प्रॉडक्ट ऐवजी ते 5 - 10 प्रोडक्टसही घेतात. त्यामुळे त्यांना ते ऑप्शन द्या.

'नो नॉनसेन्स' बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी 4 - ‘मंथ टू मंथ’ कंटिन्यूटी स्ट्रॅटेजी

तुमच्या कस्टमर्सना फक्त याच महिन्यात विकत घेण्याचे ऑप्शन न देता त्यांना प्रत्येक महिन्याला तुमचे प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस घेण्याची संधी द्या, ऑप्शन द्या. प्रत्येक बिझनेससाठी हि स्ट्रॅटेजी खूपच महत्वाची आहे. यामुळे तुमचा एक नाही तर पुढच्या 6 - 12 - 24 महिन्यांचा सेल फिक्स होतो. केवळ ह्या एका स्ट्रॅटेजीचा वापर करूनही कोणत्याही बिझनेसची भरपूर ग्रोथ आपल्याला करता येऊ शकते.

'नो नॉनसेन्स' बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी 5 - ‘कस्टमरची लाईफ टाईम व्हॅल्यू’

तुमच्या कस्ट्मरची लाईफ टाइम व्हॅल्यू ओळखा. आपली ट्रांझॅक्शन व्हॅल्यू / टिकट साईझ काहीही असेल तरीही जर तुम्ही तुमच्या कस्टमर्सची लाईफ टाईम व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्या व्हॅल्यूचा वापर करून मार्केटिंग करायला सुरुवात करता त्या क्षणापासून तुमचा बिझनेस एक्सपोनेन्शियली वाढायला सुरुवात होते.

ह्या 5 हि स्ट्रॅटेजीस मी त्यांच्याबरोबर शेयर केल्या व स्पेसिफिकली त्यांच्या व्यवसायात यांचा कसा वापर करता येईल याविषयी काही ‘ अँक्शन टॅक्टिक्स' हि त्यांच्यासोबत शेयर केल्यात. माझ्या क्लायंट कडेही इतर स्ट्रॅटेजीस सोबतच मी हह्यांचाही वापर करीत असतो.

आपल्या सर्व बांधवांनाही यांचा फायदा होऊ शकेल या हेतूने आपल्या ग्रुप्समध्येही शेयर करीत आहेत.

याविषयी काही प्रश्न, शंका किंवा तुमच्या व्यवसायात या स्ट्रॅटिजीस कशा वापरायच्या याविषयी डिस्कस करायचे असल्यास मला संपर्क करू शकता.

राजेश गुरुळे

बिझनेस ग्रोथ कन्सल्टन्ट

नाशिक

https://rajeshgurule.com